जाखडी स्पर्धेत विठ्ठल रखुमाई नाच मंडळ प्रथम

जाखडी स्पर्धेत विठ्ठल रखुमाई नाच मंडळ प्रथम
Published on

जाखडी स्पर्धेत विठ्ठल रखुमाई नाच मंडळ प्रथम
लांजा ः कलगीतुरा उन्नती समाज मंडळातर्फे ४० वर्षावरील जाखडी नृत्य स्पर्धा कुवे येथे झाली. स्पर्धेचे उद्घाटन कलगीतुरा उन्नती समाज मंडळ समन्वय समिती अध्यक्ष अभय सहस्रबुद्धे, मोहन घडशी, अध्यक्ष चंद्रकांत पालकर, उपाध्यक्ष विष्णू धाडवे आदींच्या उपस्थितीत झाले. यामध्ये विठ्ठल रखुमाई नाच मंडळ (गवाणे), बनदेवी नाच मंडळ (गवाणे) व नवयुग सेवा नाच मंडळ (आसगे) आणि श्री सत्यनारायण उत्साही नाच मंडळ (कुवे) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. उत्कृष्ट संचासाठी नूतन कला जाखडी नृत्य मंडळ (लांजा), उत्कृष्ट गायक- रवींद्र नामये (जावडे), उत्कृष्ट ढोलकीवादक- विजय नेमण (कुवे) यांना गौरविण्यात आले. स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या पथकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे
दिवाळीनिमित्त रांगोळी स्पर्धा
रत्नागिरी ः दिवाळीचे औचित्य साधून क्षत्रिय मराठा मंडळाने रत्नागिरीत मराठा समाजातील बंधू-भगिनींसाठी प्रथमच रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा रविवारी (ता. २७) दुपारी ३ ते ५.३० या वेळेत स. रा. देसाई अध्यापक महाविद्यालयात होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धा सुरू होण्याच्या १५ मिनिटे आधी रांगोळीचे साहित्य घेऊन उपस्थित राहावे. गट एकमध्ये पाचवी ते दहावी, गट दोनमध्ये ११ ते पदवी अभ्यासक्रम, गट ३ खुला गट आहे. रांगोळी प्रदर्शन पाहण्याची वेळ सायंकाळी ५.३० ते ७ पर्यंत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com