टिळक विद्यामंदिरमध्ये आयोडीन कमतरतेबाबत जनजागृती

टिळक विद्यामंदिरमध्ये आयोडीन कमतरतेबाबत जनजागृती
Published on

आयोडीन कमतरतेबाबत
टिळक विद्यामंदिरात जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ ः राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराबाबत जनजागृती केली जात आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली झाडगाव येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लोकमान्य टिळक विद्यामंदिर येथे कार्यक्रम झाला. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव आदी उपस्थित होते. यावेळी आयोडीनयुक्त मीठ वापरण्याबाबत व जनजागृतीबाबत शपथ घेण्यात आली. शाळेच्या हॉलमध्ये आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाबाबत रांगोळी स्पर्धा व पोस्टर पेंटिंग स्पर्धा आयोजित करून प्रदर्शन भरवले होते. त्यामध्ये उत्कृष्ट असणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com