भाजपच्या महावितरणकडे केलेल्या मागणीला यश

भाजपच्या महावितरणकडे केलेल्या मागणीला यश
Published on

साळवी स्टॉप परिसरास
शहर विभाकडून वीज
भाजपने केलेल्या मागणीला यश
रत्नागिरी, ता. २२ : शहरातील साळवी स्टॉप परिसर हा महावितरणच्या एमआयडीसी विभागाऐवजी शहर विभागाला जोडण्याच्या भाजपच्या मागणीला यश आले आहे. एमआयडीसी विभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याची परिसरातील नागरिकांची तक्रार होती. त्यानुसार भाजपाने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन देऊन, चर्चा करून मागणी केली होती. ही मागणी पूर्ण केल्याबद्दल भाजपाने महावितरणचे आभार मानले आहेत.
शहरातील प्रभाग क्र. चार, पाच, सहा या भागांतील कार्यकर्त्यांनी याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्याकडे प्रश्‍न मांडला. त्यानंतर सावंत यांनी तातडीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेट देत जाब विचारला व या परिसरातील लोकांना लवकरात लवकर न्याय मिळावा, हा परिसर रत्नागिरी शहर विभागाला जोडला जावा, अशी मागणी केली. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी याची तातडीने दखल घेतली आणि साळवी स्टॉप परिसर एमआयडीसी विभागातून काढून शहर युनिटला जोडण्यात आला. याबद्दल भाजपा कार्यकर्ते शैलेश बेर्डे यांनी कार्यकारी अभियंता, इंजिनिअर यांची भेट घेत आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com