-जिल्ह्यात उद्यापर्यंत वादळी पावसाचा अंदाज

-जिल्ह्यात उद्यापर्यंत वादळी पावसाचा अंदाज
Published on

जिल्ह्यात उद्यापर्यंत वादळी पावसाचा अंदाज

रत्नागिरीत मुसळधार ; सतर्क राहण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ ः जिल्ह्यातील अनेक भागात २४ ऑक्टोबरपर्यंत वादळीवारे व विजांच्या गडगटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेले १५ दिवस दुपारनंतर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भातकापणीची कामे रखडली आहे. भातपीक पूर्ण तयार झाल्याने या पावसाने ते आडवे पडत आहे. त्यामुळे शेतकरी सकाळच्या वेळेत कापणी करून पीक घरात आणण्याची लगबग करत आहे. मात्र पाऊस तेवढा अवधीच देत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. दिवाळी तोंडावर आली तरी मुसळधार पाऊस पडत असल्याने हातचे पीक वाया जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या वादळाचा परिणाम राज्यात जाणवणार नसला तरी हवामान विभागाने २४ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच विजांपासून सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या अंदाजाप्रमाणे मंगळवारी (ता. २२) रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला. दिवसभर पाऊस नव्हता. कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे अनेकजण खरेदीसाठी, फिरण्यासाठी सायंकाळी बाहेर पडले होते. मात्र रात्री अचानक गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com