इन्सुली नाक्यावर दारूसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

इन्सुली नाक्यावर दारूसह
१७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on

इन्सुली नाक्यावर दारूसह
१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २२ ः गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली पथकाने बांदा येथे कारवाई केली. हा टेम्पो नवी मुंबई येथे घेऊन जात असल्याची कबुली चालकाने दिली. याप्रकरणी चालक वलेरियाने सेबिस्तीयनो ब्रगंजा (रा. ऐरोली) याला ताब्यात घेतले. या कारवाईत १७ लाख १५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
विधानसभा निवडणूक काळात प्रथमच ही कारवाई बांदा-सटमटवाडी येथे आज दुपारी करण्यात आली. कारवाईनंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक मनोज शेवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी इन्सुली तपासणी नाका येथे भेट दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कचे इन्सुली पथक बांदा परिसरात तपासणीसाठी फिरत होते. यादरम्यान टेम्पो (एमएच ४३ बीएक्स ११५४) आला असता संशय आल्याने तपासणीसाठी थांबविला. गाडीची तपासणी केली असता त्यात महागड्या ब्रँडची दारू असल्याचे समोर आले. गाडीत गोवा बनावटीच्या दारूचे ५० बॉक्स आढळून आले. ही कारवाई इन्सुली तपासणी नाका भरारी पथकाने केली. दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com