हिट अँड रन प्रकरणातील संशयित अद्याप पसारच

हिट अँड रन प्रकरणातील
संशयित अद्याप पसारच
Published on

हिट अँड रन प्रकरणातील
संशयित अद्याप पसारच

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २२ ः येथे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील संशयित डॉमनिक आंतोन फर्नाडिस (रा. सातार्डा) घटनेला चार दिवस होत आले तरी अद्यापही फरारच आहे. सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक त्याच्या माघावर असून तो पोलिसांना गुंगारा देत आहे. गेले चार दिवस पोलिस यंत्रणा त्याच्या माघावर असून तो पोलिसांना गुंगारा देण्याचे काम करीत आहे. त्याचे मोबाईल लोकेशन काढले असता पेडणे, म्हापसा, दोडामार्ग व तळकट परिसरात आढळून येत असल्याचे गोपनीय सूत्रांनी सांगितले. मात्र, मोबाईल बंद करत असल्याने त्याचा थांगपत्ता लावण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. आज बांदा शहरातील नागरिकांनी परत बांदा पोलिस ठाण्यात हजेरी लावत त्याला तातडीने पकडा, अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com