

-rat16p22.jpg
P24N25626
ः संजय यादवराव
-------------
कोकणचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य
संजय यादवराव ः मुलभूत विषयावर चर्चाच होत नाही
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. 16 ः ‘कोकणातील पर्यटन, शेतकरी आणि मच्छीमारांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी कोणालाही वेळ नाही. माझी लढाई कुणाशीही नाही. मी कुणावरही टीका केली नाही अन् करणारही नाही. माझे व्हिजन हे केवळ कोकणचे प्रश्न सोडवणे आहे, अशी माहिती राजापूर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार संजय यादवराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.’
विधानसभेत ऊस, साखर, कापूस, द्राक्ष, डाळिंब, सोयाबीन आदी पिकांवर सविस्तर चर्चा होते; मात्र, हापूस आंबा, मच्छीमार, काजू, पर्यटन, कोकण विकासाच्या विषयांवर कधी चर्चा होत नाही. हे चित्र बदलण्यासाठी शिवस्वराज्य कोकण संघटनेच्या माध्यमातून आपण रिंगणात असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीमध्ये राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघामध्ये यादवराव अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक लढवण्याचा उद्देश स्पष्ट करताना मतदार संघाच्या आगामी विकासाचे व्हिजन साऱ्यांसमोर मांडले. ते म्हणाले, कोकण विकासासाठी प्रत्यक्ष काम करणारे अभ्यासू व्यक्तीमत्व विधानसभेमध्ये असणे आवश्यक आहे. कोकणच्या मुलभूत विषयांवर दुर्दैवाने निवडणुकांमध्ये चर्चा होत नाहीत आणि राज्याच्या विधानसभेत कधीच कोकण विकासाचे विषय महत्वाचे नसतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी सातत्याने काम करणारे कार्यकर्ते निवडून येणे गरजेचे आहे. गेली 25 वर्ष मतदार संघाचे अतोनात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.