-रत्नागिरी शहरात युवासेनेची दुचाकी रॅली

-रत्नागिरी शहरात युवासेनेची दुचाकी रॅली

Published on

rat१६p२३.jpg-
P२४N२५६३१
रत्नागिरी ः महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारार्थ युवासेनेच्या वतीने आयोजित बाईक रॅलीत सहभागी झालेले महायुतीचे उमेदवार उदय सामंत आणि अन्य पदाधिकारी.
-------

रत्नागिरीत युवासेनेची दुचाकी रॅली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : शिवसेनाच्या युवासेनेने रत्नागिरी शहरात आज भव्य बाईक रॅली काढली. या बाईक रॅलीने शहर दणाणून गेले. महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी बाईकवरून प्रवास करत या रॅलेचे नेतृत्व केले.
महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारार्थ या रॅलीचे आयोजन युवा सेनेच्या वतीने करण्यात आले होते. शहरातील मारुती मंदिर येथून सकाळी १०.१५ मिनिटांनी या रॅलीला सुरवात झाली. माळनाका, बस स्थानक, राम आळी, काँग्रेस भवन, आठवडा बाजार येथून स्वयंवर मंगल कार्यालय येथे या रॅलीची सांगता झाली. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या रॅलीसाठी खूप मेहनत घेतली होती. बहर महोत्सवाच्या माध्यमातून सामंत यांनी तरुणाईला वेगळा प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com