

rat16p29.jpg-
25668
रत्नागिरी ः अपक्ष उमेदवार दिलीप यादव पत्रकार परिषदेत बोलताना.
---------
उमेदवाराचाच उदय सामंतांना
विजयी करण्याचा निर्धार
रत्नागिरी, ता. १७ : महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत चक्क प्रतिस्पर्धी उमेदवारानेच सामंत यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे. नाचणे येथील दिलीप काशिनाथ यादव या अपक्ष उमेदवाराने हा निर्धार केला आहे. हॉटेल विवेकमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर उपस्थित होते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात नऊ उमेदवार आहेत. यादव यांनीअपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेला देखील त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नव्हती. अपक्ष उमेदवार म्हणून यादव हे आतपर्यंत प्रचारात व्यस्त होते. परंतु प्रचार संपण्याच्या दोन दिवस आधी त्यांनी या निवडणुकीच्या रणांगणातून शस्त्र म्यान केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.