नीतेश राणेंच्या प्रचारासाठी
नांदगावात महायुतीची रॅली

नीतेश राणेंच्या प्रचारासाठी नांदगावात महायुतीची रॅली

Published on

25782

नीतेश राणेंच्या प्रचारासाठी
नांदगावात महायुतीची रॅली
नांदगाव, ता. १७ ः भाजप महायुतीचे उमेदवार आमदार नीतेश राणे यांच्या प्रचारार्थ नांदगाव तिठा आठवडा बाजारात आज प्रचार रॅली काढण्यात आली. यात व्यापारी वर्गानेही सहभाग घेतला. नांदगाव आठवडा बाजारात पंचक्रोशीतील भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यापारी बांधवांना भाजपचे उमेदवार आमदार राणे यांच्या प्रचाराची पत्रके वाटत रॅली काढली. यावेळी पंचक्रोशीतील भाजप महायुतीचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बुथ अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..........
25787
पारकरांच्या प्रचारार्थ
खारेपाटणमध्ये रॅली
तळेरे, १७ ः कणकवली मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ काल (ता.१६) आठवडा बाजारादिवशी खारेपाटण बाजारपेठेत प्रचार रॅली काढण्यात आली. खारेपाटण शिवसेना शाखा कार्यालय ते खारेपाटण एसटी बस स्थानक मार्गे खारेपाटण बाजारपेठ ते घोडेपाथर बंदरपर्यंत पारकर यांची प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये खारेपाटण विभागातील ठाकरे शिवसेना पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com