उमेदवारांसह कार्यकर्ते वाड्यावस्त्यांवर

उमेदवारांसह कार्यकर्ते वाड्यावस्त्यांवर

Published on

उमेदवारांसह कार्यकर्ते वाड्यावस्त्यांवर

प्रचार अंतिम टप्प्याकडे ; विरोधकांवर नजर

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे आला असून, आता उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला आहे. संपर्क दौऱ्यांच्या माध्यमातून पक्षाचे जाहीरनामे जनतेपर्यंत पोचविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते वाड्यावस्त्या पिंजून काढू लागले आहेत. त्यासाठी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते वाड्यावस्त्या पिंजून काढू लागले आहेत. दुसरीकडे मोबाईल कॉलच्या माध्यमातून मतदारांना आपल्यालाच का मतदान करावे, याबाबतचे आवाहन केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारातील रंगत वाढली आहे.
जिल्ह्यात पाच मतदारसंघांत सर्वच उमेदवारांनी आपापल्या परिने ताकदीने व चुरशीने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. एखाद-दुसरा मतदारसंघ सोडला, तर उर्वरित सर्व ठिकाणी चुरस आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्यास सुरुवात केली आहे. एरव्ही नेत्यांच्या गाड्यांचे ताफे वाड्यावस्त्यांच्या जवळून भरधाव जात होते. आता हे ताफे वाड्यावस्त्यावरही पोचू लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढल्याचे चित्र आहे.गावागावांत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. या वेळी चिपळूण, राजापूर, दापोली मतदारसंघात चुरशीच्या लढती होतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे येथील उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांना भेटण्यावर भर दिला आहे. त्यातून मतांची गणिते जुळवली जात आहेत. गावागावांत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. विरोधी उमेदवार कोणत्या भागात होता, त्याचा माग काढून पहिला उमेदवार दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेत आहे. त्यामुळे मतदारांना दोन्ही बाजूच्या उमेदवारांना हो तुम्हालाच म्हणावे लागत आहे; पण ते त्यांच्या मनात आहे तेच करणार आहेत. या माध्यमातून सध्या वाडीवस्तीवर प्रचाराच्या गाड्या व कार्यकर्ते पोचले आहेत.
---
मोबाईलवरुन संपर्कावर भर

मोबाईल कॉलच्या माध्यमातून (टेलिकॉलिंग) मतदारांशी थेट संपर्क साधला जात आहे. त्यामधून उमेदवाराची माहिती आणि त्याचा पक्ष सांगून मतदान करा असे आवाहन केले जात आहे. वारंवार येत असलेल्या अशा कॉलमुळे अनेकजणं त्रस्त झालेले आहेत. आता मतदार महायुती की महाविकास आघाडीला प्राधान्य देणार, याचे आडाखे बांधणेही सुरु झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com