कराटे चॅम्पियनशिपमध्ये ''डॉ. देव इंटरनॅशनल''चे यश

कराटे चॅम्पियनशिपमध्ये ''डॉ. देव इंटरनॅशनल''चे यश

Published on

25827

कराटे चॅम्पियनशिपमध्ये
‘डॉ. देव इंटरनॅशनल’चे यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ः म्हापसा-गोवा फुनाकोशी वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिपमध्ये झालेल्या २५ व्या कुनमध्ये डॉ. देव इंटरनॅशनल मार्शल आर्ट अकादमीच्या खेळाडूंनी ६ सुवर्ण, ४ रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली.
यामध्ये गणेश तोरस्कर कात्यामध्ये एक सुवर्ण, कुमिते प्रकारात एक रौप्य, जिया वैचमार हिने वेपनकाता प्रकारात एक सुवर्ण, काता कुमितेमध्ये दोन कांस्य, अस्मिकुमार जैस्वाल याने वेपनकाता प्रकारात एक सुवर्ण, कुमितेमध्ये एक रौप्य, साक्षी धारणे हिने वेपनकातामध्ये एक सुवर्ण, कुमिते प्रकारात एक रौप्य, गार्गी राऊत हिने वेपनकाता प्रकारात एक सुवर्ण, कुमिते स्पर्धेत एक रौप्य, अर्णव जाधव याने वेपनकाता प्रकारात एक सुवर्ण, काता प्रकारात १ कांस्य, दिव्या पाटीलने काता व कुमितेमध्ये दोन कांस्य, कौशल बांदेकर याने काता प्रकारात एक कांस्यपदक मिळविले. या सर्व खेळाडूंना सेन्साई नागेश बांदेकर, नितीन बोन्साईव्या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे मुख्य प्रशिक्षक डॉ. महोदेव शिंदे यांनी विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. संस्थेला आयएसओ मानांकन असून राष्ट्रीय संलग्नता आहे. संस्थेच्या खेळाडूंनी कराटे पचेचच्या विश्व‌विक्रम केला आहे. सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com