शिवचैतन्य पतसंस्थेचा वर्धापनदिन

शिवचैतन्य पतसंस्थेचा वर्धापनदिन

Published on

शिवचैतन्य पतसंस्थेचा वर्धापन दिन
खेड : शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचा ३४ वा वर्धापन दिन शहरातील प्रधान कार्यालयात उत्साहात झाला. यानिमित्त आयोजित सत्यनारायण महापूजेस हितचिंतकांनी हजेरी लावत तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. पतसंस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष मिलिंद इवलेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय महाजन उपस्थित होते. सर्व संचालकांनी अल्पावधीच शहरासह भरणे, दापोली, मंडणगड, शृंगारतळी, चिपळूण येथे शाखांचा विस्तार करत सहकार क्षेत्रात दमदार ठसा उमटवला आहे.

मतदार जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंट
खेड ः येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात मतदार जगृतीसाठी सेल्फी पॉइंटचे उद्‌घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते झाले. सर्व मतदारांनी आपले कर्तव्य बजावणे आवश्यक असून याबाबत सर्वच शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून खेड पंचायत समितीमध्ये मतदान जनजागृती सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. त्याचे उद्‌घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, कार्यकारी अभियंता मयूरी पाटील, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, परशुराम इचुर आदी उपस्थित होते.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com