रत्नागिरी-सर्वांचा विचार करणारे महायुती सरकार पुन्हा येणार

रत्नागिरी-सर्वांचा विचार करणारे महायुती सरकार पुन्हा येणार
Published on

25846

सर्वांचा विचार करणारे
महायुती सरकार पुन्हा येणार
उदय सामंत : करबुडे गटात महायुतीची प्रचार सभा
रत्नागिरी, ता. १७ : महायुती सरकार लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वच घटकांचा विचार करत आहे. या सरकारने तरुण, महिला, वयोवृद्ध यांचे जगणे सुसह्य केले आहे. भविष्यातही महायुतीचे सरकार येणार असून त्यासाठी तुम्ही सर्वांनी महायुतीलाच मतदान करावे, असे आवाहन उदय सामंत यांनी केले.
करबुडे जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीच्या आयोजित प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, एसटी ५० टक्के तिकीट कपात करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वच घटकांचा महायुती सरकार विचार करत आहे. ग्रामीण भागातील अगदी सर्वसामान्य नागरिकाला योजानांचा लाभ देणारे हे सरकार आहे. तरुणांच्या हाताला रोजगार देणारे हे सरकार आहे. वयोश्री योजनेची अंमलबजावणी करून वृद्धांना देखील सवलती देणारे आणि जीवन सुसह्य करणारे हे सकरार आहे. त्यामुळे भविष्यातही महायुतीचे सरकार येणार, असा ठाम विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
या वेळी दत्ता देसाई, उमेश देसाई, प्रतीक देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, प्रवीण पांचाळ, शंकर सोनवडकर, संस्कृती पाचगुडे, करिश्मा गोताड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com