रत्नागिरी विधानसभा ः उदय सामंत
रत्नागिरी विधानसभा
P२४N२५८५३
---
- rat१७p३१.jpg-
P२४N२५८५१
उदय सामंत
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील विकासाचा अनुशेष गेल्या वीस वर्षांत टप्प्या-टप्प्यांने भरून काढला आहे. जिल्हा पर्यटनदृष्ट्या समृध्द करण्याचा प्रयत्न केला आहे. नोकरी व्यवसायानिमित्त स्थलांतरित होणारा तरुण जिल्ह्यातच राहावा, यासाठी उद्योग व्यवसाय आणून तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. वेल्लोरे आयटीपार्कचा रिलायन्स प्रकल्प रत्नागिरीत आणणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज, विधी महाविद्यालय, ओशन युनिव्हर्सिटी, आदीद्वारे रत्नागिरीला शैक्षणिक हब बनविले आहे. आता पर्यटन, औद्योगिक, आरोग्य सुविधांमध्ये जिल्ह्याला समृद्ध करणे हाच मुख्य उद्देश आहे. विकासकामांच्या जोरावर रिंगणात उतरलो आहे, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.
- राजेश शेळके, रत्नागिरी
---
पर्यटन, औद्योगिक, आरोग्य सुविधांनी
जिल्हा समृद्ध करणार : उदय सामंत
प्रश्न : निवडणुकीत उतरण्याचा उद्देश काय?
उत्तर : समाजसेवा ही माझी आवड आहे. कॉलेज जीवनापासूनच समाजातील विविध प्रश्नांना मी हात घातला. समोरच्याची अडचण सोडविल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदात मला मानसिक समाधान मिळते. तेव्हापासून समाजकार्यात उतरण्याचा निर्णय घेतला; परंतु त्यासाठी राजकीय पाठबळ महत्त्वाचे होते. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवा संघटनेच्या माध्यमातून राजकारणात उतरलो. समाजसेवेचा घेतलेला हा वसा गेली वीस वर्षे चालवित आलो आहे. तो पुढे कायम चालू ठेवणार आहे.
प्रश्न : मतदारसंघात काय बदल घडवला?
उत्तर : रत्ननगरीचा कायापालट हेच माझे ध्येय आहे. त्या अनुषंगाने १९,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ३३,६०० रोजगार निर्मिती होणारा प्रकल्प रत्नागिरीत होणार आहेत. पर्यटकांचे आकर्षण बनलेला महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा छत्रपती संभाजी महराजांचा पुतळा थिबा पॉईंट येथे उभारण्यात आला. देशातील ५ वे तारांगण रत्नागिरीत उभारण्यात आले. याच ठिकाणी विज्ञान गॅलरी देखील तयार करण्यात आली. ज्याचा लाभ हजारो शाळकरी विद्यार्थ्यांनी आजवर घेतला आहे. रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी भव्य अशी शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. हे ठिकाणही पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रत्नागिरी पॅटर्न या नावाने प्रसिद्ध झालेला सौरऊर्जा प्रकल्प गोळप येथे उभारण्यात आला आहे. सर्वांचे श्र्धस्थान असलेल्या विठ्ठलाची २९ फूट भव्य मूर्ती शहरातील माळ नाका येथील शिर्के उद्यानात उभारली. बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या रत्नागिरी शहरातील थिबा राजाकालीन बुद्ध विहाराला निधी उपलब्ध करून दिला. शहरातील सर्व सर्कलचे सुशोभिकरण करण्यात आले. शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण होत आहे. विकासकामे हीच माझी ओळख आहे.
------
प्रश्न : एज्युकेशन हबच्यादृष्टीने काय काय आणले?
उत्तर : रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा होत्या. मात्र, आता वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज, संस्कृत उपकेंद्र, शासकीय विधी महाविद्यालय, ओशन युनिव्हर्सिटी, छत्रपती शिवाजी महाराज इतिहास संशोधन केंद्र सुरू होत आहे. त्यामुळे शिक्षणासाठी रत्नागिरीच्या मुलांना बाहेरगावी जण्याची गरज भासणार नाही. रत्नागिरीत उच्च शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळणार आहेत.
प्रश्न : फेक नॅरेटिव्हविरोधात आपली काय भूमिका?
उत्तर : महायुती म्हणून रत्नागिरीत भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मनापासून काम करीत आहेत. त्यांच्यामध्ये असणारे गैरसमज दूर झाल्यामुळे आता होणाऱ्या प्रत्येक सभांमध्ये महायुतीची एकजूट दिसत आहे. विरोधी पक्षात गेलेल्यांनी फेक नॅरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न केला होता. भाजप आतून माझ्या बरोबरच राहील, असा अपप्रचार सुरू आहे; परंतु भाजप हा शिस्तीचा आणि आदेशावर चालणारा पक्ष आहे. बाळ माने यांनी भाजपच्या विचाराशी गद्दारी केली आहे. त्यामुळे बाळ माने यांना आमचा ठाम विरोध राहिला. त्यांच्यामार्फत पसरविल्या जाणाऱ्या फेक नॅरेटिव्हच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मैदानात उतरले असून, ते दुप्पट ताकदीने फेक नॅरेटिव्ह दूर करण्यात यशश्वी होत आहेत.
प्रश्न : लाडकी बहीण योजनेचा काय फायदा होईल?
उत्तर : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या निवडणुकीत गेमचेंजर ठरणार आहे. राज्यभरात फिरताना महिलांकडून मिळणारा प्रतिसाद सर्व काही सांगून जातो. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांनी तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्ष त्यांची सत्ताच येणार नसल्यामुळे ते जरी लाख रुपये देणार म्हणाले तरीही जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. तालुक्यातील ७२ हजार महिला बहिणी माझ्यासोबत राहतील, याचा मला ठाम विश्वास आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

