दापोली-खेड-मंडणगड विधानसभा उमेदवार : योगेश कदम

दापोली-खेड-मंडणगड विधानसभा उमेदवार : योगेश कदम

Published on

दापोली-खेड-मंडणगड विधानसभा

- rat१७p४०.jpg-
२४N२५८८०
योगेश कदम
- rat१७p३२.jpg-

दापोली-खेड-मंडणगड नकाशा

दापोली - खेड - मंडणगड विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी गेली पाच वर्षे मी प्रयत्नशील आहे. त्यामुळे या मतदारसंघात आरोग्य, शिक्षण, पाण्याची व्यवस्था, रस्ते, वीज यांसारख्या पायाभूत सुविधा उभारण्याला प्राधान्य देत आहे. गेल्या पाच वर्षांत या मूलभूत सुविधांसाठी मतदारसंघात अडीच हजार कोटींची विकासकामे आणली असून, ही कामे पूर्णत्वास गेलेली आहेत. छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायाची उभारणी करीत त्याद्वारे रोजगार निर्मिती केली जाणार आहे. कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम मतदारसंघात आणून विकासाची गंगा आणणार असल्याचा विश्वास दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिंदे शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना व्यक्त केला.

- सिद्धेश परशेट्ये, खेड

------
पायाभूत सुविधांसह रोजगार
निर्मितीवर भर ः योगेश कदम


प्रश्न - निवडणुकीतील नेमके व्हिजन काय?
उत्तर ः दापोली व मंडणगड तालुक्याला लाभलेली स्वच्छ अन् सुंदर समुद्रकिनाऱ्यांसह अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांना आवश्यक असलेल्या विविध सोयीसुविधांची उभारणी करीत आहे. खेड शहरानजीक वाहणाऱ्या जगबुडी नदीचा गाळ काढणे आणि त्याठिकाणी पर्यटनादृष्टीने विकास करण्यासाठी या ठिकाणी भव्य अशा क्रोकोडाईल पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. जगबुडी नदीतील गाळ काढून खेड शहर पूरमुक्त करण्यासाठी माझे यापुढे प्रथम प्राधान्य राहणार आहे.

प्रश्न - मतदारसंघात काय बदल घडवून आणला?
उत्तर ः गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील मुख्य रस्त्यासह गावागावांतील वाडी वस्त्यातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती, रस्ते रुंदीकरण मतदार संघातील अनेक नळपाणी योजनांची दुरुस्ती, नवीन नळपाणी योजना गावागावांत उभारल्या आहेत. या मतदारसंघाच्या शहरी भागातील पुलांचे रुंदीकरण आणि रस्त्याच्या रुंदीकरणासह भुयारी गटार योजनांची अंमलबजावणी करीत ही कामे मार्गी लावली आहेत. दापोली तालुक्यातील शिवस्मारकाचा अनेक वर्षे रखडलेला प्रश्न मार्गी लावला आहे. तालुक्यातील अनेक गडकिल्ल्यांची दुरुस्ती करून शिवकालीन वारसा जतन करण्याच्या प्रयत्न केला आहे. हर्णै बंदराला नवा साज मिळत आहे.

प्रश्न - भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या मतदारसंघासाठी नियोजन कसे राहणार?
उत्तर ः हा मतदार भौगोलिकदृष्ट्या अडचणींचा असला तरीही या मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास हाच दृष्टिकोन ठेवून मी गेल्या पाच वर्षांत विकासकामे केलेली आहेत. या डोंगराळ भागात प्रचार यंत्रणा राबविताना अडचणी आल्या तरीही माझे कार्यकर्ते आणि मी या गावातील प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत विकास कामाच्या माध्यमातून पोहोचलो आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात दोन महिन्यांतून एकदा तरी गावभेट दौरा करीत असतो. मतदारांच्या थेट संपर्कात असल्यामुळे मला अडचण वाटत नाही.

प्रश्न - अनेक पक्षप्रवेश आपण करून घेतले, त्याचा किती फायदा होणार?
उत्तर ः दापोली मतदारसंघातील मतदारांना विकास हवा आहे. एक उच्चशिक्षित चेहरा म्हणून ते माझ्याकडे पाहतात. माझ्या शिक्षणाचा फायदा या मतदारसंघाला होणार आहे. तरुणांचे अनेक प्रश्न माझ्यासमोर आहेत. त्यातील बेरोजगारी हा प्रथम मुद्दा असून, त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने मी गेली पाच वर्षे प्रयत्नशील आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा मी सोडविलेला आहे. त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले मिळवून दिले आहेत. त्यांच्या शासकीय नोकरीचा मार्ग मोकळा करून दिला आहे. मंडणगड तालुक्यात एमआयडीसी आणण्यासाठी मी जागा उपलब्ध करून दिली. गेल्या सहा महिन्यांत हे पक्षप्रवेश झालेले आहेत. त्यामुळे या पक्षप्रवेशाचा फायदा मला निश्चितच होणार आहे.

प्रश्न - भाजपची आपल्याला साथ कशी मिळेल?
उत्तर ः भाजप हा महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्ष म्हणून भाजपची मला साथ आणि सहकार्य मिळत आहे. ते यापुढे भविष्यात देखील कायम राहणार आहे. भाजपचे नेते रवींद्र चव्हाण हे आमचे महायुतीचे नेते आहेत. तर माझे वडील आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यांची मला साथ अन् सहकार्य कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com