शिक्षकांसाठी ‘खानमिगो’तर्फे एआय टूल लॉ
शिक्षकांसाठी ‘खानमिगो’तर्फे एआय टूल लॉ
रत्नागिरी : भारतातील सर्व शिक्षकांसाठी खानमिगो हे मोफत ‘एआय'' टूल लाँच करण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण शिक्षणासह भारतातील शिक्षकांना हे टूल सक्षम बनविणार आहे. १४ नोव्हेंबर खान अॅकॅडमी याची सुररुवात केली आहे. शिक्षकांना ‘खानमिगो'' या टूलमध्ये ‘शिक्षण सहायक'' म्हणून विनामूल्य प्रवेश करता येणार आहे. इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये ‘खानमिगो'' उपलब्ध असून हे एक एआय पॉवर शिक्षक सहायक टूल आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सोपे व्हावे, शिक्षकांची उत्पादकता वाढावी आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण वृद्धिंगत व्हावे, याकरिता हे डिझाईन केलेले आहे. शिक्षकांना खान अॅकॅडमी प्लॅटफॉर्मवर ‘खानमिगो'' यामध्ये विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. खान अॅकॅडमी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती वासुदेवन यांनी या लाँचबद्दल उत्साह व्यक्त केला आहे.
गॅस जोडणीच्या लाभासाठी सर्वेक्षण
रत्नागिरी : प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-२ अंतर्गत ४०.६३ लाख कुटुंबांनी गॅस जोडणीचा लाभ मिळविला आहे; परंतु अद्यापही काही कुटुंबे लाभापासून वंचित आहेत. यातील पात्र कुटुंबांना शोधून त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. जेवण बनविण्यासाठी वापरात येणाऱ्या पारंपरिक इंधनाच्या धुरामुळे महिलांना त्रास होतो. त्यामुळे या महिला विविध आजारांना बळी पडतात. तसेच घरातील लहान मुले स्वयंपाकघरात आजूबाजूला खेळत असतात. धुरामुळे या लहान मुलांना श्वसन संबंधित अनेक रोग होण्याची शक्यता असते. महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने व त्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे, तसेच पर्यावरणाचे संरक्षण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

