आचारसंहिता भंग झाल्यास गुन्हे नोंदवा

आचारसंहिता भंग झाल्यास गुन्हे नोंदवा

Published on

25898

आचारसंहिता भंग झाल्यास गुन्हे नोंदवा

जिल्हाधिकारी पाटील ः सिंधुदुर्गनगरीत नोडल अधिकाऱ्यांची बैठक

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १७ ः जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत मतदानाबाबत आवश्यक तयारी झाली असून मतदानपूर्व काळात आदर्श आचारसंहितेचे योग्य पालन होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य कार्यवाही करावी. कोणत्याही प्रकारे आचारसंहिता उल्लंघन होणार नाही, याबाबत सतर्क राहा. तसे झाल्यास तत्काळ गुन्हे नोंदवावेत, अशा सूचना नोडल अधिकारी यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी दिल्या.
शेवटचे ७२ तास, ४८ तास या कालावधीत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आचारसंहिता पालन झालीच पाहिजे. कुठेही अनियमितता दिसता कामा नये. स्थिर, फिरत्या पथकांची आवश्यकता वाटल्यास अजून नेमणुका कराव्यात; मात्र कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होता नये, असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी श्रध्दा पोवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शेवरे, परिवहन उपायुक्त विजय काळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, लिड बँकेचे मेश्राम तसेच संबंधित नोडल अधिकारी उपस्थित होते.
शेवटच्या कालावधीत प्रचार होत असताना होणारे आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी विशेष लक्ष देऊन जबाबदारी पार पाडा. कुठेही जाहीर प्रचार सुरू राहता कामा नये. भरारी पथकांनी चांगल्या प्रकारे सनियंत्रण करून अशा प्रचारावर बारीक लक्ष ठेवावे. स्थिर पथकांनीही चांगल्या प्रकारे सक्रिय राहून कामे करा, अशा सूचना जिल्हाधिकारी पाटील यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com