जास्तीत जास्त निधी आणून विकासकामे करणार
-rat१७p४७.jpg-
P२४N२५९०१
लांजा ः अल्पसंख्यांक मेळाव्यात बोलताना महायुतीचे उमेदवार किरण सामंत.
-------------
जास्त निधी आणून विकासकामे करणार
किरण सामंत ः लांजात अल्पसंख्यांक सेलचा मेळावा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १७ ः समाजासमाजात भेदभाव करणारा मी नव्हे, सर्व जाती-धर्माच्या जनतेला सोबत घेऊन चालणारा माणूस आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाचा विकासात्मक उद्धार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. तसेच जास्तीत जास्त निधी आणून विकासकामांतून उद्धार करु. त्याचबरोबर शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा पुरवण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी लांजा तालुका मुस्लिम अल्पसंख्यांक सेलच्या मेळाव्यात बोलताना केले.
लांजा तालुका शिवसेना मुस्लिम अल्पसंख्यांक सेलच्या वतीने आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कुरुप, नगरसेवक सोहेल मुकादम, राजन देसाई, अल्ताफ काझी, उद्योजक हनीफ नाईक, कोर्लेचे सरपंच गणेश साळुंके, अल्पसंख्यांक सेल लांजा तालुकाध्यक्ष सईद मापारी, इलियास बंदरी आदी उपस्थित होते.
किरण सामंत म्हणाले, विकासकामे मी करणारच आहे आणि ती कामे देखील तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊनच करेन. या भागात अल्पसंख्यांक निधी आणला गेला नाही. आला असेल तर तो पूर्णपणे वापरला गेला नाही. यापुढे असे होणार नाही. तसेच येथील बेरोजगारी हा अत्यंत कळीचा मुद्दा असून राजापूर, लांजामध्ये दोन मोठे उद्योग आणण्याचा प्रयत्न आहे. त्यातून युवकांना रोजगारा संधी उपलब्ध करून दिली जाईल. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी लांजा तालुका मुस्लिम अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष सईद मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष साजिद शेख, आजीम वाघु, शादाब काझी, मुनाफ दसूरकर, मोसीन दसूरकर यांनी विशेष मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

