मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोधच

मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोधच

Published on

25904


मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोधच

असनिये ग्रामस्थ ः जो उमेदवार पाठीशी राहील, त्यालाच मतदार करू

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः असनिये गावामध्ये प्रस्थापित असलेला मायनिंग प्रकल्प आम्हाला नको आहे. यासाठी आमचा गेले कित्येक वर्षे लढा सुरू असून हा प्रकल्प होऊ नये यासाठी जो उमेदवार आम्हाला सहकार्य करणार त्याच्या पाठीशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही ठामपणे उभे राहणार, अशी स्पष्टोक्ती ग्रामस्थांनी आज येथे दिली.
असनिये ग्रामस्थ दिनकर सावंत, बाळकृष्ण सावंत, मनोहर सावंत, अनिता सावंत, राधिका सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होत्या. ते म्हणाले, ‘‘असनिये गावांमध्ये होऊ घातलेल्या मायनिंग प्रकल्पामुळे आमच्या गावातील उदरनिर्वाहाचे साधन असलेली सुपारी, नारळ बागायती तसेच पर्यावरण नष्ट होणार आहे. आमचा उदरनिर्वाह सुपारी, नारळ बागायतीवरच आहे. मायनिंग झाल्यास आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यासाठी आम्ही गेले कित्येक वर्ष या प्रस्थापित प्रकल्पाविरोधात न्यायाने लढा देत आहोत. परंतु, आजपर्यंत या लढ्याकडे आणि आमच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पुन्हा एकदा आम्ही हा विषय प्रकर्षाने समोर आणत असून सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, त्यापैकी जो उमेदवार आमच्या या लढ्याला सहकार्य करणार, मायनिंग प्रकल्प रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार त्याला आम्ही या निवडणुकीमध्ये साथ देणार आहोत.’’
----------------
...तर भविष्यात आत्महत्येची वेळ येईल
कोकणी जनता ही काही झाले तरी आत्महत्या करणारी नाही. घाटमाथ्यावर शेतकरी, बागायतदार आत्महत्या करत आहेत. बदललेले पर्यावरण लक्षात घेता आणि कोसळणारा पाऊस लक्षात घेता या वर्षाचे पीक जवळपास नष्ट झाले आहे. भविष्यातही अशी स्थिती राहिल्यास येथील शेतकऱ्यांनाही आत्महत्या करणे भाग होणार आहे. पर्यावरणाला हानिकारक असणारे अशा प्रकल्पामुळे पर्यावरणाचे बदल दिसून येत आहेत. त्यामुळे आम्हाला हा प्रकल्प कायमस्वरूपी गावातून हद्दपार करायचा आहे, असे उपस्थित ग्रामस्थ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com