रस्त्यावर झाड पडल्याने आचऱ्यात वाहतूक ठप्प
25922
रस्त्यावर झाड पडल्याने
आचऱ्यात वाहतूक ठप्प
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १७ ः आचरा-हिर्लेवाडी येथील ब्राह्मण मंदिरासमोरील रस्त्यावर आज पहाटे आंब्याचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली. सकाळीच येणाऱ्या एसटी बस आणि खासगी वाहनेही अडकली होती. आंब्याच्या फांदीसोबत विद्युत वाहिन्या खाली आल्याने धोका निर्माण झाला होता. सरपंच जेरान फर्नांडिस यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ही फांदी तोडून रस्ता मोकळा केला.
हिर्लेवाडी येथील रस्त्यावर आज पहाटे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. झाडाची एक फांदी विद्युत वाहिन्यांवर पडल्याने वाहिन्या खाली आल्या. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांनी सरपंच फर्नांडिस यांना दिली. फर्नांडिस यांनी ग्रामपंचायतीचा कटर घेऊन हिर्लेवाडीत दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ पांडुरंग वायंगणकर, अश्विन हळदणकर, किशोर हिर्लेकर, तोंडवळकर यांच्या साहाय्याने रस्त्यावरील पडलेले आंब्याचे झाड हटवून रस्ता मोकळा केला. महावितरणला याबाबत माहिती देण्यात आली. सरपंच फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य मुजावर यांच्या तत्परतेबद्दल वाहनचालक व हिर्लेवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

