खारेपाटणमध्ये नीतेश राणेंची प्रचार रॅली

खारेपाटणमध्ये नीतेश राणेंची प्रचार रॅली

Published on

25932

खारेपाटणमध्ये नीतेश राणेंची प्रचार रॅली

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १७ : भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांच्या प्रचारार्थ आज सकाळी आमदार राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण बाजारपेठेत प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार राणे यांनी नागरिक व व्यापाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, शिंदे शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, शिवसेना पदाधिकारी मंगेश ब्रम्हदंडे, गुरुप्रसाद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर ढेकणे, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार, भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत, प्रवीण लोकरे, नंदू कोरगावकर, भाऊ राणे, माजी पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे, दादा कर्ले, रफिक नाईक, खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, कुरांगवणे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे, उपसरपंच बबलू पवार, शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, वायगणी सरपंच प्रताप फाटक, नडगिवे सरपंच माधवी मण्यार, शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ, चिंचवली सरपंच अशोक पाटील, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये, माजी सरपंच एकनाथ कोकाटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. खारेपाटण बसस्थानक ते बाजारपेठ मार्गे घोडेपथर बंदरपर्यंत रॅली काढण्यात आली.
--
‘निवडून येण्यासाठी राणेंचे कामच पुरेशे’
कणकवली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नीतेश राणे यांनी जाहीर सभेसाठी निमंत्रित केले होते. मात्र, हवामान खात्याने अनुकूलता न दर्शवल्यामुळे ऐनवेळी सभा रद्द करावी लागली. श्री. राणे यांनी आमदार म्हणून केलेले जे काम आहे, ते कामच त्यांना निवडून आणण्याकरिता पुरेसे आहे. कडवा हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, असे प्रतिपादन भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. कणकवलीत काल (ता.१६) फडणवीस यांची जाहीर सभा होणार होती. ती रद्द झाली. या पार्श्वभूमीवर श्री. फडणवीस यांनी आज व्हिडिओ प्रसिद्ध केला. यात त्यांनी आमदार राणेंच्या कामाची दखल घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com