मंडणगड -७४ मतदान केंद्र सज्ज
Rat१९p१०.jpg-
२४N२६२३८
मंडणगड : तालुक्यातील मतदान केंद्रावर असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मंडणगडात ७४ मतदान केंद्र सज्ज
एकूण ५७ हजार ४७७ मतदार; पोलिस बंदोबस्त
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड,ता.१९ ः विधानसभेच्या मतदान प्रक्रियेकरिता तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी तालुक्यातील ७४ मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (ता. २०) मतदान होत आहे. त्यासाठी ७४ क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ७४, आशासेविका ७०, अंगणवाडी सेविका ७०, कार्यालयीन सेवक ७०, स्वयंसेवक ७४, पोलिस अधिकारी ३, पोलिस कर्मचारी ९१, गृहरक्षक दलाचे जवान ७०, सशस्त्र सीमा दलाचे १२ जवान असे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रवासाकरिता ११ एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. तालुक्यातील १७ मतदान केंद्रांवर नेटवर्क नसल्याकारणाने या ठिकाणी १७ शॅडो मॅसेंजर (संदेश वाहकांची) नियुक्ती करण्यात आलेली आहे. तालुक्यात एकूण ५७ हजार ४७७ मतदार या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. यात २९ हजार ९१२ महिला मतदार व २७ हजार ५६६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. मंडणगड तालुक्यात १४ दिव्यांग व ८५ वर्षांच्या वरील २२६ ज्येष्ठ नागरिक असे एकूण २४० होम व्होटर आहेत. यात २१० ज्येष्ठ नागरिक मतदार व १४ दिव्यांग असे २२४ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावत गृह मतदान केले आहे.
--
मतदान प्रक्रियेचे नियोजन
विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी मंडणगड तालुक्यातील यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठी ७४ क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ७४, आशासेविका ७०, अंगणवाडी सेविका ७०, कार्यालयीन सेवक ७०, स्वयंसेवक ७४, पोलिस अधिकारी ३, पोलिस कर्मचारी ९१, गृहरक्षक दलाचे जवान ७०, सशस्त्र सीमा दलाचे १२ जवान असे कर्मचारी तैनात करण्यापर्यंत नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

