तिडे शाळेत मुंडा जयंती साजरी

तिडे शाळेत मुंडा जयंती साजरी

Published on

- rat१९p१४.jpg-
P२४N२६२४७
तिडे : जननायक बिरसा मुंडा जयंती तिडे आदिवासीवाडी शाळेत साजरी करताना.

तिडे आदिवासीवाडी शाळेत
जननायक बिरसा मुंडा जयंती

मंडणगड ः जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तिडे आदिवासीवाडी या शाळेत जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तिडे शाळेतील शिक्षक नीलेश लोखंडे तसेच प्रकाश पवार यांनी बिरसा मुंडा यांचा जीवनपट, आदिवासी समाजासाठी केलेले कार्य व चळवळ या विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला वाडीचे अध्यक्ष शंकर पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश हिलम, पोलिस पाटील रवींद्र पवार, हरिश्चंद्र जाधव, सुभाष पवार, ताई जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन मुख्याध्यापक लोखंडे यांनी केले तर आभार पवार यांनी केले.
---
तिडे आदिवासीवाडी शाळेत
मतदान जनजागृती फेरी

मंडणगड ः विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या निवडणुकीत आपल्या मतदानाचा अधिकार सर्व नागरिकांनी बजवावा यासाठी आज जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तिडे आदिवासीवाडीच्यावतीने आज संपूर्ण वाडीतून मतदान प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. मतदानासंबंधीचे घोषणा फलक हातात घेऊन तसेच ढोल वाजवून घोषणा देत संपूर्ण वाडीतून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यामध्ये वाडीतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. निवडणुकीची तारीख, वार, वेळेसंबंधीची माहिती मुख्याध्यापक नीलेश लोखंडे यांनी ग्रामस्थांना दिली व प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बजावण्याची विनंती केली.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com