कुडाळात १८०० कर्मचाऱ्यांची सज्जता
26282
कुडाळात १८०० कर्मचाऱ्यांची सज्जता
निवडणुकीची तयारी; २७९ केंद्रांवर होणार मतदान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः कुडाळ-मालवण मतदारसंघातील २७९ केंद्रांवर मतदान होणार असून आज १८०० कर्मचारी निवडणूक साहित्य घेऊन रवाना झाले. त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.
कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी कुडाळ हे मुख्य केंद्र आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी निवडणूक कर्मचारी तहसील कार्यालयात उभारलेल्या भव्य मंडपात एकत्र आले होते. निवडणूक साहित्य ताब्यात घेतल्यावर सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी काळुशे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वीरसिंग वसावे, वर्षा झालटे, शीतल जाधव उपस्थित होत्या. मतदान निरीक्षक प्रवीणकुमार थिंद यांनीसुद्धा यावेळी भेट देऊन आढावा घेतला. तहसील कार्यालयाच्या बाजूच्याच मैदानावर निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस उभ्या होत्या. सर्व कर्मचारी मग साहित्य घेऊन आपापले मतदान केंद्र असलेल्या बसमध्ये बसण्यासाठी रवाना झाले.
----
वाहन व्यवस्था अन् कर्मचारी
या मतदासंघात मालवणात १ ते १२२ आणि कुडाळात १२३ ते २७९ क्रमांकाची अशी २७९ मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर जाण्यासाठी ४३ एसटी बसची व्यवस्था केली होती. त्याशिवाय ४५ झोनसाठी ४५ जीपची व्यवस्था केली आहे. मतदान केंद्र घेऊन जाण्यासाठी कुडाळ तालुक्यात २२, तर मालवण तालुक्यात २ अशा २४ जीपची व्यवस्था केली आहे. एकूण १ हजार २३२ निवडणूक कर्मचारी आणि प्रत्येक केंद्रावर दोन असे ५५८ पोलिस कर्मचारी या वाहनातून आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले.
---
दोन लाख १७ हजार १८६ मतदार
कुडाळ-मालवण मतदारसंघात मालवण तालुक्यात १ ते १२२ आणि कुडाळ तालुक्यात १२३ ते २७९ क्रमांकाची मतदान केंद्रे आहेत. या मतदारसंघात एकूण २ लाख १७ हजार १८६ मतदार असून त्यात महिला १ लाख ९ हजार २२१ आणि पुरुष १ लाख ७ हजार ९६४ तर एक तृतीयपंथी मतदार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

