कणकवलीत रविवारी कवीसंमेलन
26286
कणकवलीत रविवारी कवीसंमेलन
प्रभा प्रेरणा काव्य पुरस्कार सोहळा ः श्रीधर चैतन्य, प्रा.पाटील यांची प्रमुख उपस्थिती
कणकवली, ता.१९ : येथील प्रभा प्रकाशनतर्फे रविवारी (ता.२४) प्रभा प्रेरणा काव्य पुरस्कार सोहळा आणि संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे समेलन होणार आहे. कलमठ गोसावीवाडी येथील अभंग निवास येथील सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लेखक आणि अनुवादक श्रीधर चैतन्य (कोल्हापूर), समीक्षक प्रा. संजीवनी पाटील (वैभववाडी), समाज साहित्य कार्यकर्ते ॲड. विलास परब (कणकवली) आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर (सावंतवाडी) उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. तसेच कार्यक्रमात कवी सफरअली इसफ यांच्या दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आजच्या बहुचर्चित ‘अल्लाह ईश्वर’ काव्यसंग्रहाला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर दुसऱ्या सत्रात होणाऱ्या या निमंत्रितांच्या कवी संमेलनात प्रा.सुचिता गायकवाड, ऋजुता सावंत भोसले, प्रमिता तांबे, श्रेयश शिंदे, ॲड. मेघना सावंत, ॲड. प्राजक्ता शिंदे, प्रियदर्शनी पारकर, रीना पाटील, आर्या बागवे, संजय तांबे, योगिता शेटकर, पल्लवी शिरगावकर, किशोर कदम, आर्या कदम, सत्यवान साटम, संदीप कदम, संतोष जाईल, हरिश्चंद्र भिसे, रामचंद्र शिरोडकर, प्रा.एन.आर.हेदुळकर, श्रवण वाळवे आदी निमंत्रित कवींचे काव्यवाचक होणार आहे. तरी काव्य रसिकांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभा प्रकाशन परिवाराने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

