मासेमारी नौकांवर कॅमेरे बंधनकारक
मासेमारी नौकांवर कॅमेरे बंधनकारक
मत्स्य विभागाचा निर्णय ः मच्छीमारांकडून होतेय दिरंगाई
रत्नागिरी, ता. १९ : जिल्ह्यातील प्रत्येक मासेमारी नौकेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र बहुसंख्य मच्छीमारांकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे मत्स्य विभागाकडून कोणती कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मत्स्य व्यवसाय विभाग व सागरी सुरक्षा यंत्रणेतर्फे मासेमारी नौकांची तपासणी वेळोवेळी करण्यात येते. अशा मासेमारी नौकांवर कार्यरत असलेले नौकामालक, तांडेल व खलाशी यांचे मूळ ओळखपत्र, नौकेची नोंदणी याचे प्रमाणपत्र, मूळ मासेमारी परवाना, विम्याच्या प्रती तसेच नौकेवरील तांडेल व खलाशी यांची मानकानुसार (VRC) जीवनरक्षक साधने, अग्निशमन साधने नसल्याचे आढळते. अतिरिक्त तांडेल किंवा खलाशी आढळल्यास सागरी सुरक्षा यंत्रणेतर्फे अतिरिक्त तांडेल, खलाशांवर कठोर कार्यवाही करण्यात येते. मच्छीमारांनी नौकेवर जीवनरक्षक साधनांसमवेत यांत्रिक नौकांवर व्हेसल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीटीएस), स्वयंचलित ओळखप्रणाली (एआयएस), जिल्हा अलर्ट ट्रान्समीटर (डीएटी) आदी यंत्रप्रणाली बसवणे आवश्यक आहे तसेच सागरी सुरक्षेचा हेतू लक्षात घेता प्रत्येक मासेमारी नौकेवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे शासनाने आदेश दिले आहेत; मात्र मासेमारी नौका मालकांकडून त्याबाबत गांभीर्याने न घेता कॅमेरे बसवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याकडे मत्स्य व्यवसाय विभागानेही अद्याप लक्ष न दिल्याने कॅमेरे बसवण्याचे आदेश कागदावरच राहिले आहेत.
आग लावलेली नौका कॅमेऱ्याविना
काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील एका मासेमारी नौकेवरील खलाशाने तांडेलाचा खून करून नौकेला आग लावली होती. या नौकेवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला नसल्याने दुर्घटनेचा अधिक तपशील हाती मिळालेला नाही. त्यामुळे अद्यापही नौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

