राजापुरात १७३ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग

राजापुरात १७३ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग

Published on

26330

राजापुरात १७३ मतदान
केंद्रांवर वेबकास्टिंग
आज ३४५ केंद्रांवर मतदान : मतपेट्या, कर्मचारी केंद्रावर रवाना
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ ः राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात बुधवारी (ता. २०) होत असलेल्या मतदानासह येत्या शनिवारी (ता. २३) होणाऱ्‍या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ३४५ मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार असून त्यासाठी सुमारे तीन हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत. यामध्ये १ लाख २४ हजार ५७० महिला, तर १ लाख १३ हजार ८३९ पुरुष असे मिळून एकूण २ लाख ३८ हजार ४०९ मतदार विधानसभा निवडणुकीसाठी आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे राजन साळवी, महायुतीतर्फे किरण सामंत यांच्यासह अपक्ष अविनाश लाड, संजय यादवराव, संदीप जाधव, अमृत तांबडे, यशवंत हर्याण, राजेंद्र साळवी हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या सर्व मतदारांचे भवितव्य मतदार मतदानाच्या माध्यमातून मतपेटीमध्ये बंद करणार आहेत. ३४५ मतदान केंद्रांपैकी १७३ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात आले आहे. दरम्यान, राजापूर शहरातील विश्वनाथ विद्यालयामध्ये सखी मतदान केंद्र, लांजा गोंडेसखल येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दिव्यांग मतदान केंद्र, तर लांजा येथील अल्अमिन उर्दू हायस्कूल येथे युवा मतदान केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. अंध, आजारी मतदारांना मदतनिसांच्या साह्याने मतदान करता येणार असून, त्याबाबत असलेल्या नियमांचे पालन करून ते करावयाचे असून तशा सूचना देऊन साहित्य मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com