कणकवलीतील केंद्रावर १३७१ टपाली मतदान
कणकवलीतील केंद्रावर
१३७१ टपाली मतदान
कणकवली,ता. १८ ः कणकवली विधानसभा मतदारसंघ अंतर्गत जे कर्मचारी निवडणुकीच्या कामकाजासाठी समाविष्ट करून घेण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी मतदान कक्ष सुरू करण्यात आला होता. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत १५०४ पैकी १३७१ कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.
मतदान केंद्रावरील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून कणकवली तहसील कार्यालयात १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान टपाली मतदान केंद्र सुविधा कक्ष स्थापन केला होता. भारत निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेप्रमाणे सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होत आहे. परंतु, मतदान केंद्रावर नेमलेले शिक्षक, अधिकारी, सुरक्षारक्षकांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी कणकवली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या देवगड वैभववाडी आणि कणकवली अथवा बाहेर गावातील कर्मचाऱ्यांसाठी टपाली सुविधा विशेष कक्ष करण्यात आला होता. सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत गेली तीन दिवस मतदान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

