कारवार विभागात उद्यापासून 
कोकण रेल्वेचा ‘मेगाब्लॉक’

कारवार विभागात उद्यापासून कोकण रेल्वेचा ‘मेगाब्लॉक’

Published on

कारवार विभागात उद्यापासून
कोकण रेल्वेचा ‘मेगाब्लॉक’

कणकवली, ता. १९ ः कोकण रेल्वेचा कारवार विभागात मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. २१ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत हा मेगाब्लॉक आहे. कारवार-हरवाडा विभागादरम्यान बॉक्स पुशिंग तंत्राने रोड अंडर ब्रिज बांधण्यासाठी चार तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या वेळापत्रकांवर त्याचा परिणाम होणार आहे. यात या मार्गावरील गाडी क्र. ०९०५७ उधना जं. ते मंगळुरू ही गाडी उद्या (ता. २०) कारवार विभागात दोन तास थांबेल. त्यानंतर मडगाव जंक्शनपासून नियमित केला जाईल. गाडी क्र. ११०९७ पुणे जं. ही गाडी ३० नोव्हेंबर रोजी दोन तास कारवार विभागात थांबेल. त्यानंतर पुणे ते एर्नाकुलम एक्स्प्रेसचा प्रवास मडगाव जंक्शन दरम्यान नियमित केला जाईल. गाडी क्र. ०६६०१ मडगाव ते मंगळुरू ही गाडी २१ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर एक तास उशिराने धावणार आहे. ही गाडी मडगाव जंक्शन येथून दुपारी ३.१० वाजता सुटेल. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकातून कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com