बौद्ध संघटना हल्ल्याविरुद्ध एकवटल्या

बौद्ध संघटना हल्ल्याविरुद्ध एकवटल्या

Published on

बौद्ध संघटना हल्ल्याविरुद्ध एकवटल्या

अण्णा जाधव जखमी ; हल्लेखोरांवर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १९ : तालुक्यातील बौद्ध समाजातील विविध संघटना एकवटल्या असून, बौद्ध समाजातील कोणाही व्यक्तीवर झालेला हल्ला हा आमच्या बौद्ध समाजावर झाला असून आम्ही ते कदापी सहन करणार नाही. जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होऊन कठोर शिक्षा झाली पाहिजे. अण्णा जाधव यांच्या जीवघेण्या भ्याड हल्ल्यात जे दोषी आहेत त्यांना योग्य ते शासन झालेच पाहिजे, अन्याय अत्याचावर आवाज उठवून न्याय देण्यासाठी गुहागर तालुक्यातील सर्व बौद्ध संघटना एकवटल्या आहेत.
बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर, भारतीय बौद्ध महासभा तालुका गुहागर या धार्मिक संघटना एकवटल्या असून, गुहागर तालुक्यातील जानवळे येथे सुरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून शांततेच्या मार्गाने तहसीलदार, पोलिस निरीक्षक आणि संबंधित यंत्रणेला निवेदन देऊन अण्णा जाधव यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरित अटक व्हायला पाहिजे आणि कारवाई व्हावी ही भूमिका घेण्यासाठी बैठक झाली. या वेळी बौद्धजन सहकारी संघ तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, कार्याध्यक्ष मारूती मोहिते, भीमसेन सावंत, विजू आप्पा कदम, सचिन मोहिते, दिनेश कदम, उत्तम पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com