मतदानासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज

मतदानासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज

Published on

-rat१९p२०.jpg-
P२४N२६२७५
रत्नागिरी ः रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील केंद्रावर साहित्य घेऊन जाण्यासाठी कुवारबाव समाजकल्याण विभाग येथे नियोजन करण्यात आले. या वेळी एसटी गाड्या आणि पोलिस बंदोबस्त करण्यात आला.
---------

मतदानासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज

रत्नागिरीत ३५२ मतदान केंद्रे ; १८ पोलिस गस्ती वाहने
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होणार असून, त्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज आहे. रत्नागिरी कुवारबांव येथील समाजकल्याण भवन (डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन) येथे ३५२ मतदान केंद्रांवरील शासकीय कर्मचाऱ्यांना साहित्य ताब्यात देण्यात आले. पोलिस दल सतर्क असून, ८४६ पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात केला आहे. तालुक्यातील पोलिस ठाण्याची १८ पोलिस गस्ती वाहने मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आली आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांनी दिली.
विधानसभा निवडणूक उद्या (ता. २०) होत असल्याने संपूर्ण शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. जिल्ह्यात मतदान केंद्रांवर मतदान प्रतिनिधी व सुरक्षापथक रवाना करण्याची प्रक्रिया सुरू होती. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आज दुपारनंतर यंत्रणा पोहचेल, अशा पद्धतीने निवडणूक विभागाने तयारी केली आहे. पोलिस यंत्रणा सक्षमपणे कार्यरत असून स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यंत्रणेला सूचना केल्या आहेत. आपापल्या केंद्रांवर जाण्यासाठी मतदान अधिकाऱ्यांची मांदियाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दिसून येत आहे. सुरक्षायंत्रणा कामाला लागली आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात जिल्ह्यातील ३०० पोलिस, जिल्ह्याबाहेरील १७६ पोलिस तसेच जिल्ह्यातील २०५ होमगार्ड व जिल्ह्याबाहेरील १६५ होमगार्ड असा ८४६ जणांचा तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर रत्नागिरी उपविभागातील रत्नागिरी मतदार संघात शहर पोलिस ठाणे, ग्रामीण, जयगड, पूर्णगड व संगमेश्वर या पोलिस ठाण्याच्या १८ पोलिस गस्ती वाहने मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.
---
सोशल मीडियावरही वॉच
मतदान प्रक्रियेदरम्यान पोलिस यंत्रणेच्या सायबर सेलकडून सोशल मीडियावरही वॉच ठेवण्यात येणार आहे. सोशल मीडियावर तेढ निर्माण होणारे अगर अफवा पसरविणारे संदेश कोणीही प्रसारित करू नयेत अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com