-रत्नागिरी ः क्राईम
कारवांचीवाडीतील
तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी ः मॅटर झालाय लवकर ये, असे मित्राला मोबाईलवर सांगून आरटीओ ब्रीज रेल्वे रुळावर झोपून कारवांचीवाडी येथील तरुणाने आत्महत्या केली. शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वासू दौलत कडपकट्टी (वय २२, रा. रवींद्रनगर-कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १८) चारच्या सुमारास आरटीओ ऑफिससमोरील ब्रीज साईनगर-कुवारबाव येथील रेल्वे रुळावर घडली. वासू हा रुळावर झोपलेला होता. मुंबईच्या दिशेने जाणारी मारू सागर एक्स्प्रेस ट्रेन गेल्याने तो मयत स्थितीत सापडला. वासू सोमवारी वडिलांसमवेत सेंट्रिंगच्या कामावर गेला नव्हता. त्याचे मित्र दुपारी रवींद्रनगर येथे गप्पा मारत बसले होते. मित्र घरी निघून गेल्यावर वासू थेट आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वे रुळावर आला. त्याने मित्राला फोन केला, मॅटर झालाय लवकर ये. त्यानंतर त्याचे मित्र तातडीने तिथे पोहोचले; मात्र तोपर्यंत वासूचा मृत्यू झाला होता.
------
अनोळखी वृद्धाचा
आकस्मिक मृत्यू
रत्नागिरीः शहरातील एम. जी. रोड नीळकंठ कॉम्प्लेक्सच्या खाली निपचित पडलेल्या अनोळखी वृद्धाचा उपचार सुरू होण्याआधीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १८) दुपारी पावणेतीनच्या सुमारास नीळकंठ कॉम्प्लेक्सच्या खाली निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खबर देणारे हे नीळकंठ कॉम्प्लेक्स बिल्डिंगच्या खाली गर्दी का आहे, हे बघण्यासाठी गेले होते. त्या वेळी अनोळखी वृद्ध निपचित पडलेला दिसला. याबाबत त्यांनी ११२ डायल केला, तसेच मेडिकल मदत मिळण्यासाठी फोन केला. त्या वेळी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वृद्धाला तपासून मृत घोषित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

