मतदारांनी हक्क बजावताना ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक
मतदानासाठी ओळखपत्र
सोबत नेणे बंधनकारक
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ ः जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया उद्या (ता.२०) होत आहे. हक्क बजावण्यासाठी निवडणूक प्रशासनाने मतदार ओळखपत्राव्यतिरीक्त अन्य बारा पुरावे ग्राह्य मानले आहेत. त्यापैकी एक सोबत नेणे बंधनकारक असल्याने मतदानाचा हक्क बजावताना याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. प्रशासनातर्फे मतदारांना आवश्यक माहिती असलेल्या स्लिप घरोघरी पोच केल्या आहेत. असे असले तरी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवताना मतदाराला ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक आहे. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र असल्यास ते सोबत नेता येईल. हे ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने ओळखपत्र म्हणून बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यात आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, निवृत्ती वेतनाचे दस्ताऐवज, वाहन चालक परवाना, मनोरेगा रोजगार ओळखपत्र, दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्ट कार्ड, कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, बँक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक, शासन, सार्वजनिक उपक्रम, खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वितरीत केलेले छायाचित्रासह ओळखपत्र, संसद, विधानसभा सदस्यांसाठीचे ओळखपत्र यापैकी कोणताही एक दस्ताऐवज यासाठी चालणार आहे. मतदारांनी हक्क बजावायला जाताना यातील एक ओळखपत्र सोबत न्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

