सोनुर्ली माऊली मंदिर
परिसराची स्वच्छता

सोनुर्ली माऊली मंदिर परिसराची स्वच्छता

Published on

सोनुर्ली माऊली मंदिर
परिसराची स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः कोकणचे प्रति पंढरपूर अशी ख्याती असलेल्या सोनुर्ली येथील सुप्रसिद्ध माऊलीच्या जत्रोत्सवाला यावर्षी भाविकांची अलोट गर्दी झाली. दुसऱ्या दिवशी सावंतवाडी आयटीआयच्या एनएनएस विभागाच्यावतीने या जत्रोत्सवाच्या परिसरात एकदिवसीय स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता अभियानात स्थानिक ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी, ग्रामस्थ यांच्यासह सावंतवाडी आयटीआय एनएनएस विभागाच्या सुमारे १०० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
या स्वच्छता अभियानात माऊली मंदिराच्या दोन्ही बाजूंनी सुमारे एक किलोमीटर परिसर स्वच्छ करण्यात आला. सावंतवाडी आयटीआयच्या एनएनएस विभागाचे स्थानिक देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत व सोनुर्ली ग्रामस्थांनी आभार मानले. यावेळी माऊली सोनुर्ली देवस्थानचे मानकरी राजू गावकर, बाळा गावकर, सरपंच भगवान हिराप, उपसरपंच भरत गावकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान कमिटीचे सर्व मानकरी, ग्रामविस्तार अधिकारी सौ. गवस, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सावंतवाडी आयटीआय निदेशक विष्णू सावंत, हर्षल कदम, श्री. ताम्हाणेकर, वरिष्ठ निदेशक मधुकर परब, एनएनएसचे कार्यक्रम अधिकारी रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com