जिल्हा रक्तपेढीसाठी ५६ जणांचे रक्तदान
26338
जिल्हा रक्तपेढीसाठी ५६ जणांचे रक्तदान
कसालमध्ये शिबिरास प्रतिसाद ः सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १९ ः सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय रक्तपेढी येथे पुढील दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. याची दखल घेऊन सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कसालच्या माध्यमातून तातडीच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करून ५६ रक्तदात्यांचे रक्त संकलन केले.
या शिबिरामध्ये एकूण ६० रक्तदात्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी ५६ रक्तदात्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढीच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. वैद्यकीय कारणामुळे ६ जणांचे रक्तदान होऊ शकले नाही. कसाल गावातील श्री सिध्दिविनायक मंदिर ट्रस्ट गेली १० वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करत असून, ८५० हुन अधिक रक्ताच्या युनिटचे संकलन झाले आहे.
त्याशिवाय आर्थिक परिस्थितीमुळे रक्तपेढीतील शुल्क भरू शकत नाही, अशा ३८०० पेक्षा जास्त गरजू रुग्णांना रक्तकार्डच्या माध्यमातून ट्रस्टच्यावतीने रक्त मोफत उपलब्ध करून दिले आहे. सिंधुदुर्गसह कोल्हापूर, बेळगांव या ठिकाणीही सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यात आले. या रक्तदान शिबिरावेळी सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी संकेत शेट्ये, तंत्रज्ञ मयुरी शिंदे, अक्षय शेळके, सहायक सुरेश डोंगरे व वैद्यकीय कर्मचारी यांनी सहकार्य केले. कसाल सरपंच राजन परब, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नवीन बांदेकर, अवधूत मालणकर, गोविंद भिसे, सिद्धिविनायक मित्रमंडळाचे कार्यकर्ते व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदानाच्या शेवटी सर्व रक्तमित्रांचे व रक्तदान शिबिर आयोजित करून रुग्णसेवेस प्राधान्य दिल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढीच्यावतीने उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ट्रस्टचे आभार व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

