गुहागरमधून अमूर ससाणा ५ दिवसांनी सोमालियात

गुहागरमधून अमूर ससाणा ५ दिवसांनी सोमालियात
Published on

गुहागरमधून अमूर ससाणा ५ दिवसांनी सोमालियात
रेडिओ टॅगिंगचा प्रकल्प ; पक्ष्यांचा मार्ग आणि पर्यावरणीय बाबींचा अभ्यास
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी,ता. 23 ः उपग्रहाद्वारे टॅग केलेल्या दोन अमूर ससाण्यांपैकी एकाने गुहागर समुद्र किनाऱ्यावरून हवेत झेप घेतली. तो तब्बल ५ दिवस १७ तासांच्या अथक प्रवासानंतर अरबी समुद्रातून पार सोमालियात मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्याची नोंद झाली आहे.
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, अमूर ससाण्याला संरक्षित पक्षी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. हे पक्षी आग्नेय आशिया आणि ईशान्य चीन यामध्ये प्रजननाच्या ठिकाणी उन्हाळ्याचा ऋतू घालवतात. हे पक्षी आफ्रिकेतील मैदानांवर हिवाळ्यात राहणे पसंत करतात. या पक्ष्यांच्या परतीचा प्रवास एप्रिल-मे मध्ये अफगाणिस्तान आणि पूर्व आशियामधून सुरू होतो. सुमारे २० हजार किलोमीटरचा वार्षिक प्रवास हे पक्षी करतात. ते भारताच्या ईशान्य क्षेत्रात तसेच सोमालियामध्ये थांबतात. मणिपूरच्या तामेंगलाँग जिल्ह्यातील एका गावाच्या नावे दोन अमूर ससाणा पक्ष्यांना उपग्रहाद्वारे टॅग करण्यात आले. पक्ष्यांच्या स्थलांतरांच्या मार्गावर वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था लक्ष ठेवत असते. या संस्थेचे शास्त्रज्ञ सुरेश कुमार म्हणाले, चिअलिआन दोनने रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे विनाथांबा प्रवास सुरू केला. हा पक्षी सोमालिया येथे पोहोचला. स्थलांतरित पक्ष्यांचा मार्ग आणि तामिंगलाँगमधील पर्यावरणीय बाबींचा अभ्यास करण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. चिअलिआन आणि वाँगग्राम ही तामिंगलाँग जिल्ह्यातील अमूर ससाण्यांची मुक्कामांची गावे आहेत. मणिपूर वनविभागाने ८ नोव्हेंबरला आणखी ९ अमूर ससाणा पक्षी सोडले. १९१८ मध्ये रेडिओ टॅगिंगचा प्रकल्प पहिल्यांदा हाती घेण्यात आला. २०१९ मध्ये ५ पक्ष्यांना असे टॅगिंग करण्यात आले होते. कबुतराच्या आकाराचे असलेले हे पक्षी नागालँड आणि मणिपूरसह ईशान्य भारतात ऑक्टोबरमध्ये येतात. आफ्रिकेत जाण्यासाठी प्रवासासाठी पुरेसे अन्न मिळाल्यानंतर ते नोव्हेंबरमध्ये हा प्रदेश सोडतात.
-----
चौकट
२ अमूर ससाण्यांना रेडिओ टॅग
मणिपूर वनविभागाच्या वन्यजीव संस्था व रहिवाशांनी ८ नोव्हेंबरला २ अमूर ससाण्यांना रेडिओ टॅग केले. हे जगातील सर्वात लांब प्रवास करणारे पक्षी आहेत. उपग्रह टॅग असलेली आणखी एक अमूर ससाणा निरीक्षणाखाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com