रत्नागिरी- रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दोन सख्खे भाऊ झाले आमदार

रत्नागिरी- रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दोन सख्खे भाऊ झाले आमदार
Published on

रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दोन सख्खे भाऊ आमदार
राणे आणि सामंत ; नितेश राणे भाजपातून, नीलेश राणे शिवसेनेतून विजयी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : एकाच कुटुंबातील वडील-मुलगा, वडील-मुलगी, सुन-सासरे राजकारणात आल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आणि पहिल्या आहेत. पण एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ विधानसभेचे आमदार झाले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच दोन सख्खे भाऊ आमदार झालेत. रत्नागिरी व राजापूरमध्ये सामंत बंधू आणि कुडाळ, कणकवलीमध्ये राणे बंधू विधानसभेत दिसणार आहेत. राज्याच्या राजकारणातील ही पहिलीच घटना आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यामध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक तर अनेक ठिकाणी अपेक्षित निकाल लागला आहे. राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी लढत पहायला मिळाली. परंतु, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामंत आणि राणे यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण दोन सख्खे भाऊ निवडणुकीच्या मैदानात उभे होते.
उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून पाचव्यांदा लढत होते. तर त्यांचे मोठे बंधू किरण सामंत हे प्रथमच राजापूर विधानसभा मतदारसंघात उतरले होते. दोघेही महायुतीकडून लढत होते. राजापूर मतदार संघात नवखे असलेले किरण सामंत हे चांगल्या मताधिक्याने निवडून आले. त्यांनी विद्यमान आमदार राजन साळवी यांचा पराभव केला. यामुळे आता उदय व किरण हे दोन सख्ये भाऊ विधानसभेत दिसणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा नारायण राणे यांचे वर्चस्व आहे. नारायण राणे हे खासदार आहेत. तर नितेश राणे हे आमदार आहेत. त्यांचे मोठे बंधू नीलेश राणे हेसुद्धा माजी खासदार राहिले आहेत. मात्र, या निवडणुकीत नीलेश हे कुडाळ- मालवण मतदारसंघातून तर नितेश हे कणकवली- देवगड मतदारसंघातून रिंगणात होते. यामुळे या लढतीकडेसुद्धा लक्ष लागले होते. दोघेही विजयी झाल्याने आता हेसुद्धा विधानसभेत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com