

27428
भाजप महिला आघाडीच्या ३२ प्रचार सभा
तीन विधानसभा मतदारसंघ ; महिला मोर्चाचा मोलाचा वाटा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ः रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात महिलांची टक्केवारी लक्षात घेता भाजपच्या महिलांनी सकारात्मक काम केल्याचे दिसून येते. भाजपच्या महिला संघटनांनी जिल्ह्यातील दक्षिण विभागात ३२ सभा घेत महिलांचे संघटन मजबूत केले.
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेश सचिव शिल्पाताई मराठे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांनी चिपळूण, संगमेश्वर, देवरूख, साखरपा, लांजा, राजापुर, संगमेश्वर खाडीपट्टा आणि रत्नागिरी ग्रामीण भाग तसेच रत्नागिरी शहर अशा ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन महिला मंडळ अध्यक्ष यांच्या सहकार्याने साठ ते सत्तर महिलांच्या उपस्थितीत सर्व जिल्ह्यात ३२ सभा घेतल्या. लाडकी बहिण योजना, पन्नास टक्के मोफत एसटी प्रवास योजना, मातृवंदना योजना, मुलींना शैक्षणिक योजना, राजकीय क्षेत्रातील महिला आरक्षण अशा विविध योजनांची माहिती देऊन महिला मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे मोठी बहीण म्हणून उभे राहण्यासाठी आवाहन केले.
रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण विधानसभा मतदार संघात महायूतीचे उमेदवार दणदणीत मताधिक्याने विजयी झाले. जिल्हा भाजप महिला मोर्चा सर्व मंडळ अध्यक्ष, सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्ते, प्रदेश महिला मोर्चा सचिव शिल्पा मराठे आणि महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.