

जिल्हा परिषदेच्या शाळांचे अस्तित्व धोक्यात
अकराशे शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या; शिक्षणासाठी शहरात धाव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ः रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहराकडे जाणारे लोंढे, जन्मदरात झालेली घट आणि इंग्रजीचा ओढा यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्ह्यातील शाळांमधीळ विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरत आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १ हजार १०० शाळा असून, ३०० पेक्षा जास्त शाळांमध्ये पाचपेक्षा कमी पटसंख्या आहे.
जिल्ह्यात एकेकाळी विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या मराठी शाळा आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काही गावांमध्ये १, तर काही गावांमध्ये २ ते ३ पटसंख्या असलेल्या शाळा आहेत. गावातील शाळा बंद पडू नयेत यासाठी स्थानिक ग्रामस्थ पुढाकार घेऊन शाळा वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी त्यांना यश येत नसून, शाळांमधील पटसंख्या घटू लागली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांची वाटचाल ही जरी डीजिटल होत असली तरी शाळांमधील घटणारी विद्यार्थी संख्या शाळांच्या अस्तित्वासाठी अडचणीची होत आहे. बहुतांश पालक हे आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी गाव, घरदार सोडून शहराकडे धाव घेत आहेत. शहरामध्ये आपल्या पाल्याला शिक्षण देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ओस पडू लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
चौकट
पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना दाखल करण्यासाठी पालकांचा ओढा वाढत आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या टिकून ठेवण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा, विविध शैक्षणिक उपक्रम शाळास्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचे बाबाजी शिर्के यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.