राजापूरला उद्या संविधान दिन

राजापूरला उद्या संविधान दिन
Published on

राजापूरला उद्या संविधान दिन
राजापूर ः तालुका बौद्धजन संघ मुंबई ग्रामीण शाखा राजापूरच्या वतीने २६ नोव्हेंबरला राजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ग्रामीण शाखेचे अध्यक्ष महादेव गोठणकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन अमृत महोत्सव आयोजित केला आहे. २६ नोव्हेंबर १९४९ साली भारतीय संविधान अमलात आले असून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून हा राष्ट्रीय दिन अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी सकाळी १०.३० वाजता जवाहर चौक ते पंचायत समिती संविधान जागृत रॅली, धम्म पूजापाठ, व्याख्यान आदी कार्यक्रम होणार आहेत. या वेळी अध्यक्ष प्रताप पवार, सरचिटणीस अनंत म्हात्रे, सल्लागार नंदकुमार जाधव उपस्थित राहणार आहेत.

राजापूर अर्बनच्या जानशी शाखेचे २९ ला स्थलांतर
राजापूर ः राजापूर अर्बन बँकेच्या जानशी पठार (मिठगवाणे) शाखेचा स्थलांतर सोहळा २९ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता चिरेखाण मिठगवाणे येथे मिठगवाणे सरपंच सौ. आशा काजवे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी अध्यक्ष सौ. अनामिका जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून एटीएम सेवेचा शुभारंभ निवेली सरपंच सौ. स्नेहा दिनेश कुवेस्कर यांच्या हस्ते होईल. या वेळी उपाध्यक्ष विवेक गादीकर, व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, शाखाधिकारी समीर चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.

ससाळेत देवदिवाळीनिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा

राजापूर ः तालुक्यातील ससाळे येथील श्री देव गांगेश्वर मंदिर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने देवदिवाळीनिमित्त २ डिसेंबरला खुल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन केले आहे. येथील श्री देव गांगेश्वर मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे देवदिवाळी उत्सव आयोजित केला आहे. सकाळी पालखी सजविणे, पूजा, ढोलवादन, पालखी मिरवणूक व रात्री खुल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा असे कार्यकम होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व चषक दिला जाणार आहे. प्रथम येणाऱ्या ५० स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी प्रदीप हातणकर, अमित चंदुरकर, किरण गुरव, विनय शिवगण, अभिषेक राठोड, लवू शिवगण यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com