

27485
दोडामार्गमध्ये महायुतीचा आनंदोत्सव
गुलालाची उधळण; विजयी घोषणांनी परिसर दणाणला
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २४ : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दीपक केसकर यांनी चौथ्यांदा दणदणीत विजय मिळविला. या विजयाचा आनंदोत्सव तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आज आठवडा बाजारादिवशी पिंपळेश्वर चौकात फटाक्यांची आतषबाजी व एकमेकांना पेढे भरवत साजरा केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे दीपक केसकर, नीलेश राणे व नीतेश राणे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात केसकर यांनी चौथ्यांदा विजय मिळवत करिष्मा करून दाखविला. त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीने गुलाल उधळला. येथील भाजप, शिवसेना, आरपीआय, अजित पवार राष्ट्रवादी या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दोडामार्ग चौकात एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. ‘महायुतीचा विजय असो’, ‘दीपकभाई आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ आदी घोषणाबाजी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, भाजप तालुकाप्रमुख सुधीर दळवी, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, प्रकाश गवस, राजू निंबाळकर, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, दादा देसाई, तिलकांचन गवस, प्रवीण गवस, बळिराम शेटये, विठोबा पालयेकर, युवा मोर्चा तालुकाप्रमुख पराशर सावंत, देवेंद्र शेटकर, दीपक गवस, हर्षद सावंत, सत्यवान गवस, गोपाळ गवस, अमर राणे, मायकल लोबो, रत्नदीप कर्पे, तुकाराम बर्डे, समीर देसाई, गोकुळदास बोंद्रे, बबलू पांगम, अनिल शेटकर, शिवसेना महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, सानवी गवस, भाजपच्या संध्या प्रसादी, गुणवंती गावडे, मनीषा गवस, वंदना सावंत, सविता नाईक, विशाखा देसाई, आदी उपस्थित होते.
दोडामार्ग तालुक्यातून सात हजारांचे लीड केसकरांना मिळाले. याचे सर्व श्रेय तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जाते. येणाऱ्या काळात आडाळी एमआयडीसी व तिलारी येथे मोठे रोजगार आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी सांगितले.
राजन तेलींना जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. त्यांना कार्यकर्त्यांची कदर नाही. अर्चना घारे यांच्या इतकीही त्यांना मते मिळाली नाहीत. केसरकर यांना इथल्या जनतेने प्रेम दिले व तेलींना त्यांची जागा दाखविली, असे मत राजन म्हापसेकर यांनी व्यक्त केले. महायुतीच्या नेत्यांमुळे दोडामार्ग नगरपंचायतीला भरघोस निधी दिला. त्याचे आज फळ मिळाले आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा भगवामय झाल्याचा अभिमान आहे, असे नगराध्यक्ष चव्हाण म्हणाले. केसरकर यांचा विजय म्हणजे जनतेचा विजय आहे. त्यांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाकडे लक्ष देणार आहोत, असे गणेशप्रसाद गवस यांनी सांगितले.
...........
बंडखोरांवर कारवाई होणार
दोडामार्ग शहरामधून केसरकरांना मोठे मताधिक्य मिळाले; मात्र काही जणांनी विरोधात काम केले. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मंत्री केसरकर व खासदार नारायण राणेंकडे करणार आहोत, असे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी सांगितले.
...........
कोट
लाडकी बहीण योजनेची ओवाळणी महिला वर्गाने महायुती सरकारला दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्याबद्दल दोडामार्ग तालुक्यातील सर्व महिलांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करते.
- संध्या प्रासादी, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.