

27490
नांदगाव, तळेरे परिसरात
महायुतीचा आनंदोत्सव
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २४ : कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार नीतेश राणे यांनी तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक करत ५८,००० एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला. राज्यातही भाजप-शिवसेना महायुतीला दणदणीत विजय मिळाल्याने नांदगावसह तळेरेत महायुतीच्यावतीने जल्लोष साजरा करण्यात आला.
गुलाल उधळीत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत ‘महायुतीचा विजय असो’, ‘भारत माता की जय’, ‘नीतेश राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. डीजेच्या तालावर गुलालाची उधळण करीत लहान मुलांपासून तरुणांनी ठेका धरला. तळेरे येथे रात्री उशिरापर्यंत फटाक्यांच्या आतषबाजीत व विविध घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजप सरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, असलदे उपसरपंच सचिन परब, नांदगाव माजी उपसरपंच नीरज मोरये, प्रदीप हरमलकर, पप्पी सापळे, प्रशांत परब, रघुनाथ लोके, मनोज लोके, संतोष जाधव, विजय आचरेकर, मारुती मोरये, कमलेश पाटील, राजू खोत, रज्जाक बटवाले, आबा बिडये, ग्रामपंचायत सदस्य शंकर मोरये, विठोबा कांदळकर आदी महायुतीचे तळेरे व नांदगाव परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.