

27474
----------
उदय सामंत यांच्या मंत्रीपदाबाबत उत्सुकता
खाते कोणते मिळणार ; कोकणातील सात नावे चर्चेत
रत्नागिरी, ता. २४ ः विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून नवीन मंत्रीमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. नव्या मंत्रीमंडळात कोकणातून सात जणांची नावे चर्चेत आली असून रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे नाव सर्वात पुढे आहे. यावेळी त्यांना कोणते खाते मिळणार याबाबत उत्सुकता आहे.
येत्या दोन दिवसात शपथविधीचा कार्यक्रम होईल अशी शक्यता आहे. काल (ता. २३) निकाल जाहीर झाल्यानंतर उदय सामंत हे मुंबईत रवाना झाले आहेत. मागील दोन टर्ममध्ये सत्तेत राहिल्यानंतर सामंत यांना मंत्रीपद मिळवण्यात यश आले होते. त्यांच्याकडे उद्योगमंत्रीपद आणि रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते. त्यापूर्वी त्यांच्याकडे सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी नगरविकास मंत्रीपदासह नऊ खात्यांचा कारभार सांभाळलेला होता. विविध खात्यांमध्ये काम करताना त्यांनी आपली छाप सोडली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली त्वरित सुरू झाल्या होत्या. त्यामुळे उदय सामंत यांनी तातडीने मुंबई गाठली. शिंदे शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव असल्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
सध्या मुंबईत नवीन मंत्रीमंडळातील नावाची चर्चा रंगलेली आहे. त्यामध्ये कोकणातून उदय सामंत, दीपक केसरकर, नितेश राणे, भरत गोगावले, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, आदिती तटकरे यांची नावे आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातून सलग दोन टर्म निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार का, याबाबतही उत्सुकता आहे. त्याचबरोबर खेड-दापोलीमधून योगेश कदमही मोठ्या फरकाने सलग दुसऱ्यावेळी निवडून आले आहेत. शिंदे शिवसेनेकडून उदय सामंत हे असल्यामुळे अन्य दोघांना संधी मिळणे अशक्य असल्याचे दिसत आहे. राजापूरमधून किरण सामंत प्रथमच आमदार झाले आहेत. त्यांचे नाव पुढे येणे अशक्य आहे.
कोट
उदय सामंत यांनी आतापर्यंत प्रत्येक खात्याला न्याय दिला आहे. त्यामुळे आता मोठ्या जबाबदारीचे खाते मिळेल अशी शक्यता आहे. मंत्रीपदाचा फायदा निश्चितच कोकणच्या विकासासाठी होणार आहे. त्यांनी दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद लिलया सांभाळले आहे.
- गजानन पाटील, माजी सभापती, पंचायत समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.