

27492
माणसाने निसर्गाकडून शिकावे
डॉ. श्रीधर ठाकूर ; कऱ्हाडे ब्राह्मण संघात विशेष पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : माणसाला द्वेष, अहंकार लगेच जडतो. एखाद्याला जास्त गुण मिळू देत, त्याने मोठी खरेदी केली मग मला का नाही, असे माणूस बोलू लागतो. पण माणसाने निसर्गाकडून शिकले पाहिजे. माडावर नारळ वर्षभर धरतात, परंतु आंबे फक्त हंगामातच मिळतात, फणस झाडाच्या बुंध्यापासून लागतात. झाडे एकमेकांच्या जवळ असतात. पण ती एकमेकांना त्रास देत नाहीत. सुख- दुःख याचा विचार न करता अनुभवाने समृद्ध व्हायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन इन्फिगो आय केअरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे आज विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.या वेळी विशेष पुरस्कारांसह विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके प्रदान करण्यात आली. कऱ्हाडे संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात कार्यक्रम झाला. या वेळी डॉ. ठाकूर यांनी प्रवास : एक अभ्युदयाचा मार्ग या विषयावर उद्बोधक विचार व्यक्त केले. या वेळी माधव हिर्लेकर, मिलिंद आठल्ये, प्रतिभा प्रभुदेसाई, प्रिया लोवलेकर, दिलीप ढवळे, मानस देसाई, चंद्रकांत हळबे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अॅड. प्रिया लोवलेकर, नर्मदा परिक्रमा पदयात्री मंदार खेर, बालगंधर्व रंगसेवा पुरस्कार विजेते राजाराम शेंबेकर, सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या पहिल्या महिला अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काही कारणास्तव नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी सत्काराला येऊ शकले नाहीत. सत्काराला उत्तर देताना अॅड. लोवलेकर, सीए अभिलाषा मुळ्ये, गुरुप्रसाद आचार्य आदींनी मनोगत व्यक्त करून हा घरचा सन्मान अधिक प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन मानस देसाई यांनी केले. आभार प्रतिभा प्रभुदेसाई यांनी मानले.
चौकट
विशेष पुरस्कार
राज्य संगीत नाट्यस्पर्धा यशस्वी कलाकारांचे मार्गदर्शक विलास हर्षे, संगीत दिग्दर्शन द्वितीय क्रमांक रामचंद्र तांबे, तबलावादनात द्वितीय क्रमांक प्राप्त अथर्व आठल्ये, गायन रौप्यपदक पटकावणारी सावनी शेवडे, अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त गुरुप्रसाद आचार्य, देवश्री शहाणे, ऑर्गनवादनात प्रथम क्रमांक प्राप्त हर्षल काटदरे, अखिल भारतीय सांस्कृतिक राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त स्वरदा लोवलेकर आणि अष्टपैलू कामगिरीबद्दल आदर्श विद्यार्थी पुरस्कारप्राप्त रुद्रांश लोवेलकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना विविध पारितोषिकांनी गौरवण्यात आले. राजाभाऊ शेंबेकर यांना शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिका सविता बर्वे यांनीही राजाभाऊंचा सत्कार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.