

-rat२९p७.jpg-
२४N२८३००
रत्नागिरी : जवाहर क्रीडांगणावर आयोजित संविधान सन्मान रॅलीमध्ये सहभागी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी.
-----------
नागरिकांनी कर्तव्यांची जाणीव ठेवून पालन करावे
डॉ. गुलाबराव राजे ः गोगटे संविधान दिनी विविध उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : भारतीय नागरिकांच्या जीवनात संविधानाने मूलगामी बदल घडवून आणले आहेत. हे बदल घडवून आणण्याचे श्रेय संविधान निर्मात्यांच्या दूरदृष्टीला द्यावे लागेल. नागरिकांनी संविधानात नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांबरोबरच मूलभूत कर्तव्यांचीदेखील जाणीव ठेवून त्यांचे पालन केल्यास भारत राष्ट्र प्रगतिपथावर जाईल, असे प्रतिपादन संविधान सन्मान समितीचे अध्यक्ष डॉ. गुलाबराव राजे यांनी केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) संविधान सन्मान समितीच्यावतीने आयोजित संविधान सन्मान रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
संविधान सन्मान समितीच्यावतीने रत्नागिरी ते चिपळूणदरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीचे उद्घाटन जवाहर क्रीडांगणावर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले. त्यानंतर प्राचार्य साखळकर यांनी सर्वांकडून संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करून घेतले. २०२४-२५ हे वर्ष भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. भारतीय संविधान हे नागरिकांशी संबंधित महत्वाचा दस्ताऐवज असून, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण संविधान, लोकशाही मूल्यांचे जतन केले पाहिजे, असे सांगितले.
प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कलाशाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्सचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.