

-rat२९p८.jpg-
२४N२८३०१
रत्नागिरी : बाबुराव जोशी ग्रंथालयात संविधान दिन ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर. सोबत डॉ. शाहू मधाळे, किरण धांडोरे, उत्पल वाकडे आदी.
-------
जोशी ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन
संविधान दिनाचे औचित्य ; दोन दिवस राहणार खुले
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) (कै.) बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले. त्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
कार्यक्रमाला हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शाहू मधाळे, संविधान दिन कार्यक्रम समितीचे समन्वयक आणि राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. निलेश पाटील, कार्यालयीन प्रमुख संजीव दांडेकर, मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शिवराज गोपाळे, उर्दू विभागाचे विभाग प्रमुख डॉ. दानिश गनी, प्रा. डी. एस. कांबळे आणि ग्रंथपाल किरण धांडोरे उपस्थित होते.
स्वागत सहायक ग्रंथपाल उत्पल वाकडे यांनी केले. संविधानाचे आपण सर्वांनी पालन करून लोकशाही बळकट केली पाहिजे; संविधानाने आपल्याला हक्क आणि कर्तव्ये दिली आहेत. लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांचे जबाबदारीने पालन केले पाहिजे, असे डॉ. साखळकर म्हणाले. ग्रंथ प्रदर्शनामध्ये भारतीय राज्य घटना, भारताचा राजकीय इतिहास, भारतातील राजकीय चाळवळी, भारतीय संविधान इ. विषयावरील ग्रंथ प्रदर्शित करण्यात आले असून हे ग्रंथ प्रदर्शन दोन दिवस खुले राहणार आहे. या कार्यक्रमाला प्राध्यापक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.