

पित्रे महाविद्यालयात कथाकथन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २९ ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य (कै.) द. ज. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ २३व्या विभागीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात १० डिसेंबरला सकाळी १० वा. करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कथाकथन कौशल्य वाढवणे तसेच त्यांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देणे हा आहे.
स्पर्धा उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ११वी आणि १२वी वर्गातील कोणत्याही शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित आहे. स्पर्धेमध्ये कोकण विभागातील (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील) कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. स्पर्धेच्या दिवशी सर्व सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक/प्राचार्यांचे स्पर्धेत सहभागी होत असल्याचे पत्र घेऊन यावे लागेल. ttps://chat.whatsapp.com/BgOuR४९llEgD०hNAxUmVGp या लिंकवर स्पर्धकांच्या सहभागाची नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.