बॅ. नाथ पै सेवांगणमध्ये संविधान दिन

बॅ. नाथ पै सेवांगणमध्ये संविधान दिन
Published on

28323

बॅ. नाथ पै सेवांगणमध्ये संविधान दिन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २९ ः येथील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज व बॅ नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ नाथ पै सेवांगण मालवण येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम संविधानामधील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर बॅ. नाथ पै संस्थेचे कार्यवाहक लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी प्रास्ताविक करून, संस्थेबदल माहिती दिली. त्यानंतर प्रा. वेदिका नाखरे यांनी संविधान दिनाचे महत्व सांगितले. संविधान या विषयावर १८ नोव्हेंबरला घेतल्या गेलेल्या संविधान विषयावरील निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आली. यामध्ये श्वेता कोळी (प्रथम), मिहीरसेन पडवे आणि सिद्धी गावकर (विभागून दुसरा), भाग्यश्री पवार (तृतीय), ललिता वारंग आणि हर्षाली पाताडे यांना विभागून उत्तेजनार्थ असे क्रमांक देण्यात आले. व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजच्या विद्यार्थी नम्रता गावडे हिने संविधानचा इतिहास, मिहीरसेन पडवेने राज्यधोरणाच्या निर्देशकांचे महत्व, श्वेता धारगळकर हिने अनुच्छेद २१ अशा संविधानामधील काही महत्वाच्या विषयांवार मुद्दे मांडले. त्यानंतर बॅ. नाथ पै संस्थेच्या कार्यकारणी मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर यांनी संविधान कशा प्रकारे अभ्यासावे याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. संस्थेचे कोषाध्यक्ष शैलेश खंडाळेकर यांनी सर्वांचे आभार मानले. व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजच्या प्रा. वेदिका नाखरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बॅ. नाथ पै संस्थेचे व्यवस्थापक संजय आचरेकर तसेच संस्थेच्या कर्मचारी वर्ग तसेच व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजच्या प्राचार्य, प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com