परुळे येथील देवस्थानचे सामंतांनी घेतले दर्शन

परुळे येथील देवस्थानचे
सामंतांनी घेतले दर्शन
Published on

28344

परुळे भोगवेतील देवस्थानात
किरण सामंतांनी घेतले दर्शन

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २९ ः राजापूर मतदारसंघात भरघोस मताधिक्याने विजयी झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी आपल्या मूळ गाव असलेल्या परुळे भोगवे येथील नेवाळी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी परुळे येथील जागृत देवस्थान श्री देव आदिनारायणचे सपत्नीक दर्शन घेतले.
आपले भोगवे नेवाळी येथील मूळ ब्राह्मण देवस्थान आणि श्री मठ संस्थान दाभोली देवून स्वामींचे दर्शन घेतले. राजापूर मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर प्रथमच आपल्या मूळ गावी आलेल्या किरण सामंत यांचे परुळे येथे पदाधिकारी यांच्याकडून स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, माजी सरपंच महेश सामंत, नूपूर सामंत, आदित्य खानोलकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com